परत
तज्ञ लेख
केळी लागवड तंत्रज्ञान

कमी भाव, उच्च पोषणमूल्य आणि सर्वकाळ उपलब्धतेमुळे केळे हे जगात सर्वात जास्त खाल्ल्या जाणाऱ्या फळांपैकी एक आहे. ते अतिशय किफायती पीकही आहे. केळी उत्पादनात भारत जगात पहिल्या क्रमांकावर आहे. केळ्याचे पीक जरी वर्षभर घेता येत असले तरी त्याची वाढ होण्यासाठी चांगला पाऊस लागतो. काही चांगल्या पद्धतींचा वापर केला तर उत्पादनात भरघोस वाढ होते. केळ्याची लागवड खड्ड्यात केली जाते. उन्हाळ्याच्या दिवसांत लागवड करायची असेल तर खड्डे महिनाभर आधी खणून ते उघडे ठेवावे लागतात. त्यामुळे मातीतल्या पिकासाठी घातक किड्यांच्या अळ्या किंवा अंडी उन्हात मरण पावतात. धैंचा किंवा चवळी यासारखी हिरवळीचे खते लागवडीच्या आठ ते दहा आठवडे आधी लावावीत आणि ती शेतात वाढू द्यावी. त्याबरोबरच, शेतात 45 दिवस आधी अंबाडी लागवड करावी आणि महिन्याभरानंतर ती जमिनीत मिसळावी. लागवडीच्या दोन महिने आधी नीट नांगरणी करावी. एफवायएमसह कडुनिंबाची पेंड आणि स्युडोमोनास फ्लुरोसन्स हे जीवाणू खत म्हणून वापरावे. लागवडीच्या वेळी मातीने खड्डे भरावे. उतीसंवर्धित रोपांचा वापर केला तर रोगमुक्त आणि एकसारखे पीक मिळते. जर उती संवर्धित रोपे उपलब्ध नसली, तर रोग आणि कीडमुक्त झाडांची कंद वापरावीत. केळ्याच्या पिकाला भरपूर अन्न आणि पाणी लागते. एका केळ्याच्या झाडाला 300 ग्रॅम नायट्रोजन, 150 ग्रॅम फॉस्फरस आणि 300 ग्रॅम पोटॅशियम विभाजित मात्रांमध्ये द्यावे लागते. सिंचनासाठी ठिबक सिंचन सर्वोत्तम. लागवडीच्या खड्ड्यांना लागवडीनंतर लगेच पाणी द्यावे, नंतर चार दिवसांनी, नंतर दर आठवड्याला द्यावे. पिकात कोणत्याही प्रकारचे तण ठेऊ नये. आच्छादन पिके करावीत आणि वर्षाकाठी किमान चार वेळा नांगरणी करावी.

undefined
undefined

भाताची पेंड, उसाचे चिपाड आणि वाळके गवत यांनी केलेले आच्छादन तणांची वाढ रोखते आणि जमिनीत ओलावा कायम ठेवते. शेतात असलेल्या अळ्या नष्ट करण्यासाठी झेंडूसारखे सापळा-पीक घ्यावे. बिव्हेरिया बासियाना सारखे जैव-नियंत्रक वापरावे लागवडीच्या दुसऱ्या महिन्यात पनामा विल्टच्या नियंत्रणासाठी तीस ग्रॅम ट्रायकोडर्मा विरीडी किंवा स्युडोमोनास फ्लुरोसेन्ट सेंद्रीय खतात मिसळून वापरावे. पिवळी तपकिरी रोगट किंवा मृत पाने दिसल्यावर काढून टाकावी. मुख्य रोपाशेजारी चूषक किंवा छोटी रोपे असतील तर ती कापून टाकावी. फक्त एक खोडवा म्हणून शिल्लक ठेवावे. केळी उगवायला लागल्यावर नर फुले काढून टाकावी. सिगाटोका ठिपक्या रोग टाळण्यासाठी पाण्याचा योग्य निचरा होत आहे, याची खातरजमा करावी. पाणी साचणे केळी पिकासाठी घातक आहे. दुबळे, हलक्या प्रतीचे घड कापून टाकावे. मोठे घड आल्यावर खोडाला बांबू किंवा दोरखंडाने आधार द्यावा. लागवडीनंतर तीन ते चार महिन्यांनंतर मातीची पातळी भर घालून रोपाच्या तळाकडून 12 इंचांनी वाढवावी. घडांना प्लास्टिकच्या कपड्याने झाकावे, मात्र हवा मिळण्यासाठी दोन्ही टोके उघडी ठेवावी. बुटक्या जातीची केळ 11-14 महिन्यांत फलनायोग्य होते, तर उंच जातीच्या केळीला 14-18 महिन्यांचा कालावधी लागतो. जैविक परिपक्वता आल्यावरच कापणी करा. कापलेले घड पिकवण्यासाठी कृत्रिमरित्या तापमान वाढवलेल्या हवाबंद खोलीत दोन ते तीन दिवस ठेवा.

आमचे मोबाईल अँप डाउनलोड करा

जाता-जाता शेत: आमच्या अँपसह, कधीही, कुठेही खरोखर-वेळ मार्केट डेटामध्ये प्रवेश करा. तुमच्या भाषेतही उपलब्ध.

google play button
app_download
stars इतर विनामूल्य वैशिष्ट्ये stars
आता अँप डाऊनलोड करा