परत
तज्ञ लेख
ठिबक सिंचन केलेल्या शेतातील सर्वोत्तम खत-सिंचन पद्धती

खत-सिंचन म्हणजे सिंचन पाण्यात विरघळवून पिकांना खतांचा पुरवठा करणे. ठिबक सिंचन किंवा थेंब सिंचन एक आर्थिक आणि पर्यावरण अनुकूल सिंचन तंत्रज्ञान आहे. झाडांना केवळ फक्त मुळांच्या भागातच पाणी दिले जाते.वाहून गेल्यामुळे किंवा फवारण्यामुळे होणारा पाण्याचा अपव्यय यामुळे टाळून 50% सिंचित पाणी वाचविता येऊ शकते, खतांची आवश्यकता 70% कमी केली जाऊ शकते.

ओळी किंवा झाडांच्या दरम्यानच्या जमिनीच्या अतिरिक्त भागांमध्ये पाणी किंवा खत मिळत नाही म्हणून तण वाढणे देखील कमी होते. कामगारांची मजुरी कमी होते. हे घटक पीकांची गुंतवणूक कमी करतात. पाणी टंचाई, कमकुवत आणि कमी सकस मातीत खत-सिंचन हा सर्वोत्तम पर्याय आहे. अतिरिक्त खतांमधल्या मिठाच्या शोषणामुळे होणारे माती किंवा भूमिगत पाण्याचे प्रदूषण रोखले जाते. या पद्धतीमुळे पिकांच्या उत्पादनात 23% वाढ झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

undefined
undefined
undefined

यंत्रणा:

यंत्रणा:

ठिबक सिंचन जलवाहिन्यांच्या जाळ्याद्वारे काम करते. त्यात मुख्य, उपमुख्य आणि पृष्ठस्तरीय जलवाहिन्यांचा समावेश असतो. या जलवाहिन्यांना उत्क्षेपक किंवा ठिबकयंत्र पिकांच्या मुळांजवळ येतील अशा पद्धतीने जोडलेली असतात. ड्रीपर ताशी दोन ते वीस लिटर एवढ्या मंदगतीने पाणी सोडतात. शेतात गरजेनुसार केव्हाही ठिबकसिंचन करता येते. ठिबकसिंचनाच्या यंत्रणेत दाब आणि नलिकांमधला प्रवाह नियंत्रित करण्यासाठी मुख्य भाग असतो. खत-सिंचनामध्ये या मुख्य नियंत्रकाला खताच्या टाक्या जोडलेल्या असतात.

undefined
undefined

बसवण्याचा खर्च:

बसवण्याचा खर्च:

खत-सिंचन प्रणाली बसवण्याचा प्राथमिक खर्च अनेक घटकांवर अवलंबून असतो. ज्या शेतात दोन वाफ्यांमधलं अंतर 1.2 मीटर आणि दोन रोपांमधलं अंतर 60 सेंमी आहे अशा ठिकाणी खत-सिंचन प्रणालीचा खर्च एकरी सुमारे साठ ते सत्तर हजार रुपयांपर्यंत येऊ शकतो. जवळ जवळ लागवड केलेल्या पिकामध्ये हा खर्च वाढतो. यासाठी शासनाकडून पीएसकेएसवाय- पंतप्रधान कृषी सिंचन योजनेअंतर्गत अर्थसहाय्य केले जाते. “सूक्ष्मसिंचन- थेंबागणिक जास्त पीक” हे या योजनेचं ब्रीदवाक्य आहे. तिचा लाभ घेण्यासाठी शेतकरी त्यांच्या जिल्हा उद्यानविद्या विभागाशी संपर्क साधू शकतात. एकदा बसवल्यानंतर ही यंत्रणा सुमारे 20 वर्षे चालते.

काळजी:

काळजी:

ड्रिपरचा व्यास अगदी लहान, 0.2-2 मिमि एवढा असतो. म्हणून पाणी अडणे टाळण्यासाठी पाण्यात कोणताही कचरा, गाळ, शेवाळ किंवा सूक्ष्मजीव नाहीत याची खातरजमा करुन घ्यावी. खते पाण्यात विरघळणारी असावी. युरिया पाण्यात विद्राव्य असल्यामुळे पिकासाठी तो नायट्रोजनचा मुख्य स्रोत असतो. अमोनियम सल्फेटमुळे सल्फेट क्षारांचा गाळ तयार होत असल्यामुळे ते टाळावे. फॉस्फरसकरिता द्रवरुप फॉस्फॉरिक आम्ल वापरावे, सुपर फॉस्फेट कधीही वापरु नये, कारण त्याची पाण्यातल्या क्षारांसह अभिक्रिया होऊन फॉस्फेट क्षारांचा गाळ तयार होतो.

सूक्ष्म पोषक पदार्थ आणि फॉस्फॉटिक खते वेगवेगळ्या टाक्यांमध्ये ठेवावीत, कारण त्यांची एकेमेकांशी अभिक्रिया होण्याची आणि क्षारांचा गाळ तयार होण्याची शक्यता असते. पोटॅशियमयुक्त खते सर्वसाधारणपे पाण्यात विरघळतात. सूक्ष्म पोषक द्रव्ये ग्राभरुपात वापरावी. यात कॅल्शियम, मॅग्नॅशियम, लोह, जस्त किंवा तांबे यासारखी सूक्ष्मद्रव्ये इटीटीएसारख्या एखाद्या सेंद्रीय रेणूने लेपित केली जातात. त्यामुळे त्यांची इतर क्षारांशी अभिक्रिया होत नाही आणि नलिका गाळ साचून बंद होण्याचा धोका टळतो. नलिका नियमितपणे क्लोरिन किंवा आम्लाने धुवून स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे. उंदरांपासून होणारे नुकसान आणि थेट सूर्यप्रकाश टाळण्यासाठी प्लास्टिकच्या नलिका भूमिगत असाव्या.

आमचे मोबाईल अँप डाउनलोड करा

जाता-जाता शेत: आमच्या अँपसह, कधीही, कुठेही खरोखर-वेळ मार्केट डेटामध्ये प्रवेश करा. तुमच्या भाषेतही उपलब्ध.

google play button
app_download
stars इतर विनामूल्य वैशिष्ट्ये stars
आता अँप डाऊनलोड करा