कलिंगड लागवडीसाठी जमीन आणि वातावरण
कलिंगड लागवडीसाठी जमीन आणि वातावरण
कलिंगड हे पिक उष्ण वातावरणात घेतले जाणारे पिक आहे, योग्य निचरा होणारी आणि पाणी धरून ठेवणारी जमीन लागवडीस योग्य आहे. कलिंगड झाडाला चांगली वाढ होण्यासाठी सतत पाणी देणे गरजेचे आहे आहे पण जर पाणी जास्त झाले तर मूळ सड होणारे रोग होऊ शकतात.कलिंगड लागवडीसाठी 6-6.5 पी.एच असणे गरजेचा आहे. कलिंगड पिकासाठी फळाची योग्य वाढ होण्यासाठी 35-40 डिग्री तापमान गरजेचे आहे.
लागवडीस जमिन करणे आणि लागवड पध्दत
लागवडीस जमिन करणे आणि लागवड पध्दत
➥ जमीन तयार करण्यासाठी 2-3 वेळा मशागत करणे गरजेचे आहे ,जेणेकरून लागवडीस जमीन योग्य होईल.अशी जमीन उत्पनादन वाढवण्यास योग्य ठरवते. शेणखत 7-8 टन एकरी टाकल्याने उत्पनादनात वाढ होते.
➥ दोन ओळीतील अंतर हे 150 सेमी असणे गरजेचे आहे तसेच दोन झाडातील अंतर 45 सेमी असणे गरजेचे आहे.
➥ बियाने लागवड करते वेळेस जमीनीत २-3 सेमी खोल लागवड केळी पाहिजे, एका एकरासाठी 300-400 ग्राम बियाणे गरजेचे आहे.
➥ कलिंगड चांगले उत्पादन घेण्यासाठी बेड तयार करून त्यावर ड्रिप लावण करणे गरजेचे आहे तसेच मल्चिंग करणे गरजेचे आहे,मल्चींग केल्याने लवकर पिक त्रय होण्यास मदत होते आणि ताणाची वाढ होत नाही.
कलिंगड लागवडीसाठी खताची शिफारस
कलिंगड लागवडीसाठी खताची शिफारस
➥ कलिंगड लागवडी साठी खताची मात्रा जमिनीची सुपीकता आणि सेंद्रिय कर्ब यावर अवलंबून असते. सर्वसाधारण पहिली खताची मात्रा 25.50.50 एन.पी.के. आणि लागवडी नंतर 30 दिवसांनी 25.00.50 प्रती एकर देणे गरजेचे आहे.
➥ पहिले फुल निघाल्या नंतर 500 ग्राम बोरॉन प्रती देणे गरजेचे आहे. बोरॉन ची दोन ते तीन वेळा फवारणी केल्यास काळी निघण्यासाठी आणि उत्तम फळ धारणा होण्या साठी मदत होते.
➥ कलिंगड लावलेली जमीन नेहमी तण मुक्त ठेवावी जेणेकरून किड व रोगाचा प्रसार होणार नाही.
कलिंगड फुलोरा अवस्थेमध्ये घ्यावयाची काळजी
कलिंगड फुलोरा अवस्थेमध्ये घ्यावयाची काळजी
➥ प्रत्येक पाणी दिल्यानंतर ठेकुलची योग्य माती तयार होणे गरजेचे आहे जेणेकरून झाडाची योग्य वाढ होण्यास मदत होते.
➥ कलिंगड पिकामध्ये फुलोरा कालावधीत मादी कळी आणि नर कळी यांचे प्रमाण अनियमित असते, झाडावर पहिल्या वेळेस नर कळी फुल येते तेथून सातव्या क्रमाकावर मादी फुल येते.
➥ योग्य फळ धारणा हि वातावरण वाणाची जात, लागवड पद्धती ,हवामान आणि पाणी देण्याची योग्य पध्दत आणि परागीकरन करणारे किटक यावर अवलंबून असते.
पारगीकरण
पारगीकरण
➥ कलिंगड मध्ये फळ धारणा होण्यासाठी परागीकरण करणारे किटक हे फुलोरा कालावधीत असणे गरजेचे आहे.
➥ मध माशी हि कलिंगड मध्ये परागीकरण करणारी प्रमुख किटक आहे, फुलोरा कालावधीमध्ये एकरात एक तरी मध पेठी असणे गरजेचे आहे. जेणेकरून फळ धारणा होण्यास मदत होते, एक मध मध माशी एका झाडला 10-15 वेळेस भेट देणे गरजेचे आहे.
कलिंगडा मधील कमतरता कशी भरून काढावी
कलिंगडा मधील कमतरता कशी भरून काढावी
➥ ब्लॉसम एंड रोट नावाची कमतरता हि कॅल्सिम च्या कमतरते मुळे तयार होते.याची कमतरता भरून काढण्यसाठी कॅल्सिअम फवारणी करणे गरजेचे आहे.
➥ फळातील पोकळ पाना आणि फळ न पिकणे हि एक प्रकारची कमतरता झाडामध्ये आहे हि अनुवंशीय किंवा अन्न द्रव्याचा अभाव आणि वातावरण यावर अवलंबून असते.
➥ ऊन चट्टा हि समस्या उनाची जास्त तीव्रता असलेल्या भागात दिसून येते.हि समस्या भरून काढण्यासाठी झाडाची योग्य कॅनोपी असणे गरजेचे आहे.
कलिंगड मधील मुख्य रोग
कलिंगड मधील मुख्य रोग
➥ झाडे नेहमी निरोगी व रोग मुक्त ठेवावेत, लागवडीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये हे कलिंगड हे पाने निरोगी असणे गरजेचे आहे जेणेकरून फळातील गोड सुद्धा टिकून.काही मुख्य कलिंगड मधील रोग.
•भुरी रोग
•पानावरील रोग
•फळ सड
कलिंगड मधील मुख्य किड
कलिंगड मधील मुख्य किड
• मावा
• पांढरी माशी
• नाग आळी
• फुलकिडे
➥ कलिंगड मधील किड 5-6 वेळा फवारणी करून नियंत्रणात येऊ शकते.
➥ शिफारस केलीली किटकनाशके पांढरी माशी आणि फुलकिडे यांच्या नियंत्रणसाठी फवारणी करावी.
कलिंगड काढणीस आले का आकासे ओळखावे.
कलिंगड काढणीस आले का आकासे ओळखावे.
➥ फळाला वाजवल्याने डल प्रकारचा आवाज येतो
➥ फळाच्या शेंड्याला देठ कुजलेला दिसतो.
➥ फळाच्या जमिनी लागतचा भाग पिवळा पडतो.
कलिंगड काढणी
कलिंगड काढणी
कलिंगड काढणी हि फळे परिपक्व झाल्यानंतर करावी , फक्त फळाची साएज वाढली म्हणून करू नये. कलिंगड परीक्व झाल्यानंतर काढणी केल्याने त्याची टेस्ट चांगली येते आणि फळामध्ये लाल गडद रंग तयार होतो.कलिंगड काढणी नंतर त्यामधील साखरचे आणि पाण्याचे प्रमाण वाढत नाही. कलिंगड काढणीस आलेले हे त्याचा जमिनी लागताच भाग पिवळा होतो आणि गोड जास्त लागते. सर्वसाधारण 50-55 टन कलिंगड अडीच एकरात निघते,यासाठी योग्य जात आणि योग्य लागवड पध्दत महत्वाची आहे.
हा लेख वाचल्याबद्दल धन्यवाद, आम्हाला आशा आहे की आपण लेख आवडण्यासाठी चिन्हावर क्लिक करा आणि लेख आपल्या मित्रांसह आणि कुटूंबासह देखील सामायिक करा!