“माझं नाव पांडुरंग इनामी. मी औरंगाबादहून 30 कि.मी. अंतरावर असलेल्या पैठण तालुक्यात राहतो. आमचा हा प्रदेश अतिशय कोरडा आहे, पण कापूस, मका आणि लिंबूवर्गीय फळांसारखी पिकं घेण्यासाठी पाऊस पुरेसा आहे. 2000 ते 2003 या काळात मला पाण्याच्या गंभीर तुटवड्याचा सामना करावा लागला. इथे भूजल देखील अतिशय कमी आहे आणि उन्हाळ्यात ते आटतं. अशा प्रकारे मी पावसाचं पाणी साठवण्यासाठी शेततळं बांधलं आणि अशा रीतीने बोअरवेलमधून भूगर्भातील पाणी पुन्हा चालू केले.त्या काळात मी आयसीआरआयएसएटी, हैदराबाद येथे प्रशिक्षण कार्यक्रमात भाग घेतला. तिथे मला कळलं की शेततळ्याच्या प्रभावी पद्धतीने पाणी साठवलं जाऊ शकतं आणि त्या पाण्याचा वापर सीझनदरम्यान शेतात सिंचनासाठी होऊ शकतो.”
“त्यांचं उदाहरण घेऊन मी शेततळ्याच्या बांधकामांची सुरूवात केली. कोणत्याही शेततळ्याचं बांधकाम करण्यासाठी, तलावाचं क्षेत्र अशा ठिकाणी असणं आवश्यक आहे जिथे पाणी सहजतेनं वाहून नेता येईल आणि पिकांकडे वळवता येईल. मातीचं खोदकाम आणि वाहतूक मॅन्युअल श्रम किंवा एक्सकेवेटर आणि ट्रॅक्टरसारख्या मशीनसह एकत्रित करता येते.” शेतकरी पांडुरंग म्हणाले
मातीचं खोदकाम ट्रॅक्टर-ऑपरेटेड लेव्हलरच्या मदतीने कुशलतेने केलं जाऊ शकतं. तलावाच्या एका टोकापासून मातीचे खोदकाम सुरू करता येतं. आवश्यक खोलीपर्यंत माती काढा. सर्व्हिस खड्ड्याच्या तळापासून माती पूर्णपणे काढून टाकल्यावर माती भरण्याऐवजी खड्ड्याला कडांच्या बाजूने कापून आकार द्यावा. यामुळे शेततळ्याच्या कडा नीट बांधून होतील.
100x100x12 क्यूबिक फुट तलावाचे खोदकाम करण्यासाठी बाजार दर रु. 80,000 ते रु. 90,000 एवढा आहे. पण या योजने अंतर्गत शेतक-यांना सब्सिडीही मिळते. माझं शेततळं 250 फूट X 250 फूट X 28 फूट आहे. मला महाराष्ट्र सरकारकडून 100% सबसिडी मिळाली आणि सध्या पॉलीथीन शीटच्या किंमतीवर सुमारे 50% सबसिडी आहे.
शेततळ्यातलं हे पाणी ठिबक सिंचनाने 20 एकर जमीनीचं सिंचन करण्यासाठी पुरेसं आहे .सध्या मी ऊस, चिकू आणि मोसंबीची लागवड करीत आहे. एकदा बांधलं की शेततळ्याला किमान देखभाल आणि दुरुस्तीची आवश्यकता असते. पाणी झिरपणं आणि इतर प्रकारचं नुकसान टाळण्यासाठी, तलावांच्या कडेला उच्च घनतेचं पॉलिथिलीन लावावं. मी डीपी प्लास्टिक रतलामकडून एचडीपी सामग्री वापरली. ती 10 वर्षांपेक्षा जास्त काळ टिकली.
शेततळ्यांना योग्य अस्तर लावलं तर झिरपण्याचं प्रमाण कमी करता येतं.या अस्तरात प्लॅस्टिकचा प्रभावीपणे वापर करता येतो.पण प्लास्टिकचा वापर करताना प्लास्टिकची निवड, ते अंथरणं आणि खराब होण्यापासून रोखणं यासाठी पुरेशी काळजी घेण्याची गरज असते. या सगळ्या प्रक्रियेत प्लास्टिकचं कापड खराब होऊ नये यासाठी धसमुसळी हाताळणी किंवा प्लास्टिक खेचणं टाळा.प्लास्टिकला भोकं पडू नयेत यासाठी अस्तर घालणं चालू असताना कामगारांना पॉलिथिनवर चालू देऊ नका. हे टाळणं शक्य नसल्यास, त्यांना अनवाणी पावलांनी चालणं आवश्यक आहे. तलाव तयार झाल्यावर तो दीर्घकाळ चांगला रहावा म्हणून त्याची नियमित तपासणी आवश्यक असते.म्हणूनच वेळोवेळी तपासणी करणं ही तलाव जास्त काळ टिकण्याची गुरुकिल्ली आहे. यात तपासणी, काही समस्या असल्या तर त्यांचं निवारण, आणि बिघाड झाला तर दुरुस्त करणं हे सगळं समाविष्ट आहे. शेततळं खराब होऊ नये यासाठी ही नियमित तपासणी आणि पुढील हानीचे टाळण्यासाठी त्वरित दुरुस्ती करणं आवश्यक आहे.
शेततळ्याच्या चांगल्या व्यवस्थापनासाठी पुढील महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत:
- तळ्याच्या आसपास जनावरं येऊ नयेत यासाठी नीट कुंपण घालावं.
2.शेततळ्यात मासे पाळले तर उत्पन्न वाढतं. मी माझ्या शेततळ्यात रोहू, कटला यासरखे गोड्या पाण्यातले मासे वाढवले. त्यांच्यापासून मला प्रति किलो 120 रुपये उत्पन्न मिळालं.या माश्यांपासून मला आठ महिन्यांच्या काळात 80,000 रुपये मिळाले.
शेततळं हा दुष्काळाशी लढण्याचा प्रभावी उपाय आहे. त्यामुळे शेतीचं उत्पन्नही वाढतं. शेतकऱ्यांनी जलसंधारण करुन उत्पादनक्षमता वाढवण्यावर भर दिला पाहिजे.