परत
तज्ञ लेख
पपई लागवड तंत्रज्ञान

पपई हे एक लोकप्रिय फळ आहे ज्यामध्ये उच्च पौष्टिक तत्व आणि औषधी तत्त्वासाठी उपयुक्त आहे. हे इतर कोणत्याही फळ पिकाच्या तुलनेत लवकर येते, एका वर्षापेक्षा कमी कालावधीत फळे देते आणि फळांचे उत्पादन प्रति एकर क्षेत्रामध्ये खूप जास्त असते.

माती व हवामान

माती व हवामान

undefined

हे एक उष्णकटिबंधीय फळ पीक आहे आणि ज्या भागात उन्हाळ्याचे तापमान 35 डिग्री ते - 38 ° डिग्री या तापमानात चांगली वाढते. दंव सहन करणारे पीक असून समुद्रसपाटीपासून 1200 मीटर उंचीवर येते.कॉलर रॉट रोग टाळण्यासाठी एकसमान असलेली चांगली निचरा होणारी माती अत्यंत उपयुक्त ठरते.

undefined
undefined

लागवड हंगाम :- पपई लागवड भारतामध्ये खालील हंगामामध्ये केली जाते.

➥ वसंत ऋतू

➥ मान्सून ऋतू

➥ शरद ऋतू

पपई वाण :-

पपई वाण :-

तयवान ७८६ ,पुसा नन्हा ,रेड चिली, ग्रीन बेरी, आइस बेरी, रासबेरी, मेरिओला.

व्यावसायिकदृष्ट्या पपई बियाण्याद्वारे लागवड केली जाते. टिश्यू कल्चर तंत्र केवळ संशोधन प्रयोगशाळांपुरते मर्यादित आहे. बियाणे कमी कालावधीत राहते म्हणून बियाणे एका हंगामापेक्षा जास्त काळ साठवले जाऊ शकत नाही.

undefined
undefined

पपई मधील अंतर

पपई मधील अंतर

1.8 x 1.8 मीटर अंतर. साधारणपणे ठेवावे.दाट लागवड करावयाची असेल तर 1.5 x 1.5 मी अंतर ठेवावे.

undefined
undefined

फळ पीक लागवड योग्य पद्दत

फळ पीक लागवड योग्य पद्दत

सुरुवातीला एकाच ठिकाणी 3 ते 4 रोपांची लागवड करता येते आणि अतिरिक्त झाडे काढताना प्रति खड्डा एक झाड ठेवावे त्यासाठी 10 टक्के पुरुष झाडे मादी झाडाच्या तुलनेत असणे गरजेचे आहे जेणेकरून परागीकरण होण्यासाठी आणि फळ धारणा होण्यासाठी हे खूप गरजेचे आहे.

undefined
undefined

आंतरमशागत

आंतरमशागत

अंतर मशागत वाढीच्या सुरुवातीच्या काळात तण काढून टाकण्यासाठी करणे गरजेचे आहे , तण ओळी दरम्यान खुरपणी देखील मुळांच्या सभोवतालून केल्याने चांगली हवा खेळती राहून अनुकूल असे वातावरण मुळाच्या सानिध्यात तयार होते. काही वेळा लागवडी पूर्व तणनाशक देखील वापरले जाऊ शकतात.

undefined
undefined

पपई फुल धारणा

पपई फुल धारणा

पपईची झाडे हि नर, मादी किंवा हर्मॅफ्रोडाइट (नपुसंक) झाडांमध्ये वर्गीकरण केले जाते ते फुलांच्या प्रकारावर आधारित दिसून येते. सामान्यतः पपईच्या वनस्पतींचे लिंग वाढीच्या टप्प्यात तापमानानुसार बदलू शकते.

undefined
undefined
undefined
undefined

पाणी देणे

पाणी देणे

चांगल्या वाढीसाठी, उत्पादन आणि गुणवत्तेसाठी, जमिनीतील आर्द्रता टिकविण्यासाठी पाणी देणे गरजेचे आहे. पाणी देण्याचा कालावधी पिकाचा हंगाम, पीक वाढ आणि जमिनीच्या प्रकारावर अवलंबून असते. कोणत्याही परिस्थितीत पाणी साचू देऊ नका त्यामुळे मुळे आणि खोड कुजण्याचे प्रमाण वाढते. ठिबकने पाणी देणे फायदेशीर आहे आणि दररोज एका झाडाला द्यावयाच्या पाण्याचे प्रमाण निश्चित करून पाणी देणे गरजेचे आहे.

undefined
undefined

खते आणि खतांचा वापर

खते आणि खतांचा वापर

प्रति एकर एनपीके @ 200 किलोचा डोस, 8-10 टन शेणखत 20 ते 40 किलो सूक्ष्म अन्न द्रवे घटक आणि समुद्री शेवाळ टाकणे गरजेचे आहे.

किड व रोग नियंत्रण

किड व रोग नियंत्रण

लालकोळी

लालकोळी

लालकोळी पानांतील रस शोषून घेते त्यामुळे पानांवर पिवळे डाग दिसून येतात, पानाच्या खालील बाजेने प्रादुर्भाव जास्त होतो आणि त्यामुळे पाने गाळून पडतात.

undefined
undefined

पिट्ठ्या ठेकूण

पिट्ठ्या ठेकूण

लांब तोंड रस शोषक कीड पानामध्ये घालून आणि पानातील रस शोषून घेतात.जास्त प्रादुर्भाव झाला कि झाडाची वाढ कमी होते आणि फळांची गुणवत्ता खराब होते.

undefined
undefined

पांढरी माशी

पांढरी माशी

पांढरी माशी हि कीड पपई पिकावर हमखास दिसून येते. हि कीड पानाच्या खालून रस शोषण करून घेते, पाने पिवळे होऊन वाकडे होतात. हि कीड विषाणू पसरण्यास कारणीभूत आहे.

undefined
undefined

मर

मर

झाडाची मर अधिक आद्रता आणि कमी आद्रते मुळे होते, जास्त आद्रते मुळे बुरशीजन्य रोग तयार होतात,या रोगाची लक्षणे लागवडी आधी व लागवडी नंतर दिसून येते.

undefined
undefined

पानावरील डाग

पानावरील डाग

बुरशीजन्य रोगहे पानांवर दिसून येतात . थंड तापमान आणि पावसाळ्याच्या महिन्यात हा रोग अधिक प्रादुर्भाव जास्त दिसून येतो. जुन्या पानांवर पानांचे ठिपके अधिक सामान्य असतात आणि पाने पिवळी पडतात, प्रादुर्भाव झालेल्या झाडाच्या फुलांची गळ होताना दिसून येते.

undefined
undefined

पपई रिंग स्पॉट व्हायरस

पपई रिंग स्पॉट व्हायरस

वरच्या पानांमध्ये पिवळे मोज़ेक दिसू लागतात आणि लहान पानांच्या देठावर आणि हिरव्या तेलकट रेषा दिसतात. हे रिंग स्पॉट्स फुले आणि फळांवर दिसतात. प्रादुर्भाव झालेली झाडे 5-100% दरम्यान उत्पादन मध्ये नुकसान होऊ शकते. हा रोग मावा किडी द्वारे पसरतो.

undefined
undefined
undefined
undefined

पपई लीफ कर्ल

पपई लीफ कर्ल

या रोग तंम्बाकू लीफ कर्ल व्हायरस मुळे होतो. प्रादुर्भाव झालेली पाने वाकडी होतात आणि पाने पिवळी पडतात व पानांची साइज मध्ये घट होते, प्रादुर्भाव झालेल्या झाडाला फुले काही वेळा लागतात तर काही वेळा लागत नाही.

undefined
undefined

टीप :- रोग आणि किडींच्या नियंत्रणासाठी कीटकनाशकाचा व बुरशीनाशकाचा वापर करावा. भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी रोको थिओफिनिटे मेथायलं ७० डब्लू पी ची फवारणी करावी.

टीप :- रोग आणि किडींच्या नियंत्रणासाठी कीटकनाशकाचा व बुरशीनाशकाचा वापर करावा. भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी रोको थिओफिनिटे मेथायलं ७० डब्लू पी ची फवारणी करावी.

पीक काढणी

पीक काढणी

पपई ची काढणी ९ ते १० महिन्यात सुरु होते, काढणीला आलेली पपईच्या फळावर पिवळे चट्टे दिसून येतात, पपईचे झाडे जास्त उंच नसतात ते हाताने पपई तोडणी करावी लागते. पपईच्या काही जाती ७५ ते १०० किलो प्रत्येक झाडाला पपई लागतात.

undefined
undefined

हा लेख वाचल्याबद्दल धन्यवाद, आम्हाला आशा आहे की आपण लेख आवडण्यासाठी चिन्हावर क्लिक करा आणि लेख आपल्या मित्रांसह आणि कुटूंबासह देखील सामायिक करा!

आमचे मोबाईल अँप डाउनलोड करा

जाता-जाता शेत: आमच्या अँपसह, कधीही, कुठेही खरोखर-वेळ मार्केट डेटामध्ये प्रवेश करा. तुमच्या भाषेतही उपलब्ध.

google play button
app_download
stars इतर विनामूल्य वैशिष्ट्ये stars
आता अँप डाऊनलोड करा