गांडूळ खत म्हणजेच गांडुळाची विष्ठा. हे एक उत्कृष्ट पोषक पदार्थांनी परिपूर्ण असं नैसर्गित खत आणि मातीचा कस वाढवणारा पदार्थ आहे. सेंद्रिय पदार्थ खाणाऱ्या एसिनिया फिटीडा म्हणजे लाल गांडूळ किंवा लुब्रिकस रुबेलस यासारख्या गांडुळाच्या प्रजातीचा गांडूळ खत बनवण्यासाठी वापर केला जातो. महाग आणि घातक अश्या रासायनिक खतांपेक्षा गांडूळ खत हा एक अतिशय स्वस्त आणि पर्यावरणपूरक पर्याय आहे. गांडूळ खतामुळे जमिनीच्या नांगरणीची खोली वाढते तसंच मातीमध्ये हवा खेळती राहते आणि मातीतल्या उपयोगी सूक्ष्म जीवांचं प्रमाणही वाढतं. नीट विघटन झालेल्या शेणखतापेक्षा गांडूळ खतामध्ये पाचपट जास्त नायट्रोजन, सहापट जास्त फॉस्फरस आणि चारपट जास्त पोटॅशियम असतो. गांडूळ खतामुळे माती आणि झाडांतून हवेत होणारं पाण्याचं उर्ध्वपातन कमी होतं. त्याचप्रमाणे पिकाला रोगाची लागण होण्याती शक्यता आणि कीडीचा प्रादुर्भाव किंवा तण उगणवण्याची शक्यताही कमी होते. पिकाचं फलनाचं प्रमाण आणि उत्पन्नाचा दर्जाही वाढतो.
गांडूळ खत तयार करण्याच्या जागी हवा खेळती असावी. त्या ठिकाणी सांडपाण्याची व्यवस्था असावी. त्याचप्रमाणे तिथे दमटपणा 40-50%, तापमान 28-30°सेल्सियस असावं. तसंच तिथे सावली असावी. गांडूळ खत खळगे, टाकी, जमीन, लाकडी रॅक अशा ठिकाणी करता येतं. त्या जागी आधी प्लास्टिकचं आच्छादन घालावं. त्यामुळे पोषक पदार्थ खाली झिरपणार नाहीत.
गांडूळ खतनिर्मितीची सर्वात जास्त वापरली जाणारी पद्धत म्हणजे प्लास्टिकची गादी. ही गादी साधारण 9 फूट लांब, 4 फूट रुंद आणि 2.5 फूट उंच असते. अशी एक गादी बनवण्यासाठी सुमारे ₹ 3500 एवढा खर्च येतो. या गाद्या जमिनीच्या पृष्ठभागापासून उंचावर काहीशा उतारासह बसवलेल्या असतात. सांडपाण्याचं भोक जमिनीवर खालच्या बाजूला असावं. गादी तयार करताना आधी कडबा अंथरावा, त्यावर कडुनिंबाची पानं पसरावी. त्यावर पाणी शिंपडून मग साधारण आठवड्यापूर्वीचं शेण (6-7क्विंटल) पसरावं. हे शेण शेतातली स्वच्छ माती किंवा रॉक फॉस्फेट यासह 3:1 प्रमाणात मिसळावं. त्यावर पाणी शिंपडा. मग त्यात साधारण पाच किग्रॅ एवढी गांडुळं मिसळा. कडब्यानं झाका. शेवटी त्यावर ओल्या तागाच्या पिशव्या पसरा.ही गादी टोकापर्यंत भरु नका. वर साधारण 4 इंच जागा सोडा. नियमित पाणी द्या: हिवाळ्यात 2-3 दिवसांतून एकदा,उन्हाळ्यात रोज पाणी द्या. पावसाळ्यात पाणी देण्याची गरज नाही. शक्यतो, गांडुळांना आहेत त्या अवस्थेत राहू द्या. तीन महिन्यात गांडूळ खत तयार होतं.
अखेर, कापणीच्या वेळी ही गडद तपकिरी किंवा काळसर चहा किंवा कॉफीच्या भुकटीसारखी दिसते. कापणीपूर्वी आठवडाभर पाणी देणं बंद करा. गांडूळ खताची गादी उन्हात ठेवा किंवा त्यावर प्रकाश पडेल अशी व्यवस्था करा. गांडुळांना प्रकाश सहन होत नसल्यामुळे ती मातीत खोल जातील. किंवा गादीमध्ये एक लहान खड्डा करुन त्यात शेणखत टाका. आजूबाजूची सगळी गांडुळं ते खाण्यासाठी तिथे एकत्र येतील. छोट्या खुरप्यानं गांडूळ खत खरवडून काढा. हे गांडूळ खत 2मिमिच्या चाळणीतून काढा आणि प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये भरा. गादीमध्ये उरलेल्या गांडुळांचा असाच वापर पुन्हा करता येतो. दुसऱ्या वेळी गांडूळ खत अडीच महिन्यांत तयार होईल. तिसऱ्यांदा ते तयार व्हायला दोन महिने लागतील. त्यानंतर प्रत्येक 45-60 दिवसांनी आपल्याला गांडूळ खत मिळेल.
याप्रकारे वर्षातून आपल्याला गांडूळ खताची 4-6 निर्मिती चक्रं घेता येतील. दर एक क्विंटल शेणामागे आपल्याला 70 किग्रॅ गांडूळ खत मिळू शकतं. गांडूळखतासाठी केलेल्या वाफ्यातून ड्रेनेज पाईपमधून मिळणाऱ्या द्रवपदार्थाला वर्मिवॉश असं म्हणतात. हा सूक्ष्म पोषकद्रव्य, मोठी पोषकद्रव्यं, चयापचयकारक पदार्थं, विकरं आणि जीवनसत्वं यांनी युक्त असा द्रव असतो. त्याचा पिकाचा वाढीसाठी खूपच उपयोग होतो. शेतकरी स्वतःच्या शेतीसाठी गांडूळ खत तयार करु शकतो, तसंच व्यावसायिक तत्वावरही गांडूळ खताची निर्मिती करता येते. बाजारात गांडूळ खत दहा रुपये किलो दरानं तर वर्मिवॉश ₹ 200-300/लिटर दरानं विकला जातो.
डॉ. पायल सक्सेना