नमुना घेण्याची सर्वोत्तम वेळ पेरणीपूर्वी किंवा लावणीपूर्वी असते. अनेक क्षेत्रात हा काळ बिगरहंगामी असल्याने, हंगामापूर्वी मातीचे परीक्षण करण्यासाठी आणि तुमच्या मातीच्या पोषणात्मक आवश्यकता जाणून घेण्याची ही योग्य वेळ असते. मातीचा नमुना शेतातील किंवा चाचणी होणाऱ्या शेताच्या भागातील असावा. मातीचे नमुने घेण्यासाठी, १-२ सेमीचा मुख्य व्यास असणारे विशेष गिरमिट सोयीचे असते, पण छोटी फावडीसुद्धा वापरता येऊ शकतात. कोणत्याही परिस्थितीत, हव्या असलेल्या नमुन्याच्या खोलीतील वरपासून खालपर्यंतचा मातीचा एकसमान नमुना घ्यावा. नमुना घेण्याची योग्य खोली ६ ते ७ इंच म्हणजे १ फूट खोल असते, वरील पृष्ठभाग साफ करावा आणि ५०-१०० ग्रॅमची बाजूची ढेकळे गोळा करावीत. अशा प्रकारे १ एकर क्षेत्रातील २० ठिकाणांहून गोळा करा. नीट मिसळा आणि ५०० ग्रॅमचा प्रातिनिधीक नमुना तयार करून तो घेऊन जावा.
हे सर्व नमुने एका बादलीत गोळा करावेत. चार तुकडे पाडून किंवा विभाग करून तो लगदा अर्ध्या किलोएवढा कमी करा. चार तुकडे पाडण्यासाठी व्यवस्थित मिसळलेल्या नमुन्याचे चार समान भाग करावे लागतात. दोन समोरासमोरचे तुकडे फेकून दिले जातात आणि उरलेले दोन पुन्हा मिसळून हीच प्रक्रिया नमुन्याचे हवे ते माप मिळेपर्यंत पुन्हा पुन्हा केली जाते. विभाग पाडण्यासाठी लांबी-रुंदीच्या रेषेत आणि त्यांवरून ओळी आखल्या जातात. प्रत्येक विभागातून चिमूटभर माती घेतली जाते. नमुन्याचे हवे असलेले माप मिळेपर्यंत ही प्रक्रिया परत केली जाते. नमुना स्वच्छ कापडी पिशवीत घ्या. नमुने पानांनी आणि फांद्यांनी दूषित होऊ देऊ नका. प्रत्येक नमुन्यावर शेताची ओळख सांगणारी, शेतकऱ्याचे नाव आणि पत्ता, त्याआधीची पिके, आणि ज्या पिकासाठी पोषणाची शिफारस हवी आहे त्यांचे वर्णन करणारी पट्टी लावलेली असावी. गोळा केलेला मातीचा नमुना विश्लेषणासाठी मातीची चाचणी करणाऱ्या प्रयोगशाळेत पाठवावा.