परत
शासकीय योजना
राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना
वर्णन : दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील एकमेव कमावत्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यावर, कुटुंबाला रु. 20000/- ची मदत पुरवली जाते. पात्रता :
- अर्जदार कुटुंब हे दारिद्र्य रेषेखालील असावे.
- मयत व्यक्तीचे वय मृत्युच्या वेळी 18 ते 60 वर्षे यामध्ये असावे.
- मयत व्यक्ती कुटुंबाची प्रमुख कमावणारी असावी. ती स्त्री किंवा पुरुष कोणीही असू शकते.
- रहिवासी राज्य = महाराष्ट्र
- मृत्यू होऊन एक वर्षापेक्षा जास्त कालावधी झालेला नसावा.
प्रक्रिया :
- तुमच्या जवळच्या समाज कल्याण विभागाला किंवा तहसीलदार कार्यालयाला योग्य कागदपत्रांसह भेट द्या.
- तुम्हाला ह्या योजनेचा अर्ज कुटुंबाती एकमेव कमावत्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर एका वर्षाच्या आत करावा लागेल.
- अर्जदार हा मृत्यू झालेल्या व्यक्तीचा कायदेशीर वारस असावा. जर मृत व्यक्तीचे मृत्युपत्र उपलब्ध नसेल तर बायकोला/नवऱ्याला किंवा मुलांना कायदेशीर वारस मानलं जाईल.
- अर्जदाराच्या बँक खात्यात लाभ पाठवला जाईल. जर मृत्यू स्थानिक क्षेत्राच्या बाहेर झाला असेल तर मृत्युपत्र मिळण्यासाठी वेळ लागु शकतो, अशा वेळी मृत्यूपत्रासाठी अर्ज लवकरात लवकर करावा.
लाभ : एकरकमी रु. 20000 अर्थसहाय्य