ही योजना पहिल्या “Press Information Bureau, Government Of India” वेबसाइटवर प्रकाशित करण्यात आला आणि अधिक माहितीसाठी, आपण “http://pib.nic.in/newsite/erelease.aspx?relid=116207” वेबसाइटवर भेट देऊ शकता.
प्रधानमंत्री पीक विमा योजना (PMFBY) प्रधानमंत्री पीक विमा योजनेची उद्दिष्टे - नैसर्गिक आपत्ती, कीटक आणि रोग यांचा परिणाम म्हणून शेतकऱ्यांना निर्देशित पिकाचे होणाऱ्या नुकसानीपासून विमा कव्हरेज देणे आणि आर्थिक मदत करणे.
- शेतकऱ्यांना शेतीमध्ये टिकवून ठेवण्यासाठी त्यांचे उत्पन्न स्थिर ठेवणे
- नवनवीन आणि आधुनिक शेतकी कार्यपद्धती आत्मसात करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करणे.
- शेती क्षेत्रात प्रतिष्ठेचा प्रवाह अबाधित ठेवणे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत येणारी पिके:
- खाद्य पिके (तृणधान्ये, बाजरी आणि कडधान्ये)
- तेलबिया
- वार्षिक व्यावसायिक / वार्षिक बागायती पिके
प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत पत्करले जाणारे धोके आणि वगळलेल्या गोष्टी:
1 . पिकांचे टप्पे आणि धोके ज्यामुळे पिकाचे नुकसान होते आणि ज्यांचा कव्हर या योजने अंतर्गत मिळतो ते पुढीलप्रमाणे आहे a ) प्रतिबंधित पेरणी / लागवडीचा धोका : कमी पाऊस किंवा प्रतिकूल हंगामी परिस्थिती यामुळे विमा उतरविलेल्या क्षेत्रामध्ये पेरणी किंवा लागवडीला प्रतिबंध घातला जातो. b ) उभी असलेली पिके (पेरणी पासून कापणीपर्यंत) : प्रतिबंधित न करता येणारे धोके उदा. दुष्काळ, कोरडा दुष्काळ, पूर, कीटक, रोग, भूस्खलन, नैसर्गिक आग, विजा, वादळ, गारपीट, चक्रीवादळ, प्रचंड चक्रीवादळ, तुफान, चक्रीवादळ आणि वावटळ यांमुळे होणाऱ्या पीक नुकसानीला व्यापक जोखिम विमा पुरविला आहे. c) कापणी पश्चात नुकसान : जे पीक वळवण्यासाठी किंवा चक्रीवादळ आणि वादळी पाऊस आणि अवेळी पाऊस यांपासून होणाऱ्या विशिष्ट नुकसानीपासून बचाव करण्यासाठी क्षेत्रामध्ये पसरलेले असातात त्या पिकांना कापणी पश्चात केवळ दोन आठवडे हे कव्हरेज उपलब्ध आहे. d ) स्थानिक हवामान : गारपिटी, भूस्खलन, आणि दुःष्काळ सदृश परिस्थितीमुळे सूचित क्षेत्रातील स्थानिक विभक्त शेतजमिनींना होणारे नुकसान.
- सामान्य अपवाद : पुढील संकटांमुळे झालेले नुकसान किंवा त्यांचा धोका वगळला जाईल :- युद्ध आणि घरगुती संकट, आण्विक जोखिम, दंगली, दुर्भावनापूर्ण नुकसान, चोरी, शत्रुत्व, कुटूंब आणि / किंवा घरगुती आणि / किंवा जंगली प्राण्यांनी नष्ट केलेले पीक, कापणी नंतरचे नुकसान जसे झोडपणी पूर्वी बांधून ठेवलेली पिके किंवा इतर प्रतिबंधित धोके. प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत एकत्रित विमा/ कव्हरेज मर्यादा:
- जिल्हा स्तरीय तांत्रिक समितीने घेतलेल्या निर्णयाप्रमाणे प्रति हेक्टर एकत्रित विमा कर्जदार आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांना समान असेल आणि आर्थिक मापदंडही समान असतील ज्याची SLCCCI द्वारे घोषणा आणि जारी केले जाईल. आर्थिक मापदंडासाठी इतर कोणतीही गणना लागू नसेल. एका शेतकऱ्याचा एकत्रित विमा हा प्रति हेक्टर वित्त गुणिले विम्यासाठी सूचित केलेल्या पिकासाठीच्या प्रस्तावित भागाचा क्षेत्रफळ इतका असेल. ‘लागवडीखालील क्षेत्र’ नेहमी हेक्टरमध्ये सूचित करावे. 2 . सिंचित आणि बिगर सिंचित जमिनीसाठी वेगळावेगळा एकत्रित विमा असेल. प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत प्रीमियम दर आणि प्रीमियम सबसिडी:
- अंमलबजावणी संस्थेकडून PMFBY अंतर्गत विमाशास्त्रीय विमा दर लागू केला जाईल. विमा शुल्क शेतकऱ्यांकडून भरले जाईल जे पुढीलप्रमाणे आहे: हंगाम - खरीप पिके : धान्य आणि तेलबियांचे पीक (सर्व धान्य, बाजरी आणि तेलबिया, डाळी)
शेतकऱ्यांकडून भरण्यात येणारे जास्ती जास्त विमा शुल्क : (एकत्रित विम्याची एक्केवारी) SI किंवा विमाशास्त्रीय दराच्या किंवा जे कमी असेल त्याच्या 2 टक्के.
हंगाम : रब्बी पिके : धान्य आणि तेलबियांचे पीक (सर्व धान्य, बाजरी आणि तेलबिया, डाळी) हंगाम - खरीप आणि रब्बी पिके: वार्षिक व्यावसायिक / वार्षिक बागायती पिके शेतकऱ्याकडून देय कमाल विमा शुल्क (विमा रक्कमेच्या %):
SI किंवा विमाशास्त्रीय दराच्या 5% किंवा किंवा जे कमी असेल ते. प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठीचे अर्ज खालील दुव्यावर उपलब्ध आहेत: http://www.aicofindia.com/AICEng/Pages/DownloadForm.aspx अधिक माहितीसाठी, कृपया खालील वेबसाइटला भेट द्या: http://www.aicofindia.com/AICEng/Pages/PMFBY-OPERATIONAL-GUIDELINES.aspx