लष्करी अळी (स्पोडोपेटेरा फ्रुगीपेरडा) ने भारतातील अनेक भागांमध्ये आक्रमण केले आहे आणि मका, ज्वारी, तांदूळ आणि ऊसासारख्या पिकांना प्रादुर्भाव करताना निदर्शनास आले आहे.ह्या किडीकडे शेतकऱ्यांना गांभार्याने लक्ष देण्याची गरज आहे, किडींच्या व्यवस्थापनासाठी जागरुकता आणि लवकर शोध घेणे महत्वाचे आहे. गेल्या वर्षी कर्नाटकमध्ये ही कीड आढळून आली आणि अनेक राज्यांमध्ये आणि पिकांवर वेगाने पसरली. फार्मराईज टीमच्या वतीने आम्ही याविषयी जागरूकता निर्माण करून या किडीचे व्यवस्थापन करण्यासाठी सर्वोत्तम माहिती देणार आहोत.
या किडीचा शोध, लक्षणे, ओळख
या किडीचा शोध, लक्षणे, ओळख
सध्या लष्करी अळीसाठी कामगंध सापळे उपलब्ध आहेत. पतंगाचे व्यवस्थित निरीक्षण करण्यासाठी लागवडीच्या दोन आठवडे आधी हे सापळे लावा. उंच खांबाला हा सापळा उभ्या स्थितीत जमिनीपासून 1.25 मीटर उंचीवर लटकवून ठेवा. रोपे उगवल्यानंतर सापळा आणि आमीष / गंध दोन्ही रोपाच्या उंचीपेक्षा 30 सेमी अधिक उंचीवर असतील याची खबरदारी घ्या. सापळ्याकडे किमान आठवड्यातून एकदा किंवा त्याहून जास्त वेळ लक्ष देणं आवश्यक आहे. अळीचा पतंग करडा किंवा तपकिरी असून त्यावर अनियमित खुणा असतात.
अळी कशी ओळखावी
अळी कशी ओळखावी
चित्रात दाखवल्याप्रमाणे लष्करी अळीची प्राथमिक अवस्था ओळखणे सोपे आहे.(चित्र 3). या अळीच्या डोक्यावर इंग्रजी Y ची ठळक खूण असते. त्यामुळे ती चतुरासारखी दिसते. तिच्या पृष्ठभागावर चार काळे ठिपके असतात. तिचा रंग हिरवा ते गडद हिरवा असू शकतो.
शिफारस (एमपीकेव्ही राहुरी)
शिफारस (एमपीकेव्ही राहुरी)
जैविक निंयत्रण:
ट्रायकोग्रामा 50000 अंडी 10 दिवसांच्या अंतराने 3 वेळा शेतात सोडावे. किंवा
नोमुरीया 2 ग्रॅम प्रति लिटर पाणी प्रमाणात मिसळून फवारणी करावी.
मेटारायझीयम ॲनीसोपली 6 ग्रॅम प्रति लि पाण्यात मिसळून फवारणी करावी.
रासायनिक नियंत्रण:
-
थियामेथॉक्सम १२.६ + लैम्ब्डा-साइहलोथरिन ९.५% झेडसी ८० - १०० मिली २०० लिटर पाण्यातून फवारणी करावी.
-
क्लोरनट्रानिलिपोल १८.५% एससी ६० मिली १५० लिटर पाण्यातून फवारणी करावी.
-
स्पाइनटोराम ११. ७% एससी १८० - २०० मिली २००लिटर पाण्यातून फवारणी करावी.